सगळ्यांच्या घराघरात जेवण पोहोचवणारी आघाडीची फूड एग्रिगेटर कंपनी म्हणजे 'झोमॅटो'. घरबसल्या जेवण मागवायचं म्हंटलं की सहजच झोमॅटो ॲप सहज उघडले जाते. मात्र आता या ॲपचं नाव बदलल्याची अपडेट समोर आली आहे. झोमॅटोने नाव बदलून आता ते 'इटर्नल' असे ठेवले आहे. कंपनीच्या बोर्डाने या बदलाला मंजूरी दिली आहे. तसेच याबद्दलची माहिती कंपनीने स्टॉक एक्सचेंजलादेखी दिली आहे. तसेच दिपेंदर गोयल यांनीदेखील यासंदर्भात भाष्य केले आहे.
झोमॅटो ग्रुपचे सीइओ व सह-संस्थापक दिपिंदर गोयल यांनी सांगितले की, "जेव्हा आम्ही ब्लिंकइट खरेदी केले होते तेव्हा इटर्नल या नावाचा वापर करु लागले. तसेच झोमॅटो जेव्हा मोठं होईल तेव्हा याचं नाव बदलून इटर्नल ठेवणार असं ठरवलं होतं. त्यामुळे आता त्यांनी हे नाव बदलून इटर्नल लिमिटेड असे ठेवले आहे". तरीही झोमॅटो ॲपचं नाव मात्र बदललं जणार नाही असेही दिपेंदर यांनी स्पष्ट केले आहे. इटर्नल अंतर्गत झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट व हायपर प्योर हे चार व्यवसाय सुरु राहणार आहेत.
दरम्यान कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय घेण्याआधी 23 डिसेंबर 2024 रोजी झोमॅटो BSEच्या टॉप शेअर्समध्ये सहभागी झाला होता. तसेच सेंसेक्समध्ये जागा तयार करणारा हा एक पहिला टेक स्टार्टअप असल्याने खुप अभिमानाची बाब असल्याचेही दिपेंदर म्हणाले.
झोमॅटो शेअर्स :
गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये झोमॅटोचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. कंपनीचे शेअर्स 0.95 टक्क्यांनी आणि 2.20 रुपयांनी 229.05 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप 2,21,041.28 कोटी रुपये आहे.