जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये धर्म विचारुन दहशदवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. यावेळी हल्ला करणारे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. या हल्ल्याची जबाबदारी TRFने स्वीकारली आहे. याचपार्श्वभूमिवर पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार एक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली आहे. बैठकीत तब्बल अडीच तास मंथन झालेलं आहे. या बैठकीत अमित शाह, राजनाथ सिंह, एस. जयशंकर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस बैठकीचे निकाल परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी जाहीर केले.
या बैठकीत सीसीएसने सिंधू पाणी करार स्थगिती तसेच वाघा-अटारी सीमा तात्काळ बंद करण्याचा आणि पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आणखी काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.
CCSच्या बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय
कॅबिनेट सुरक्षा समितीकडून दहशदवादी हल्ल्याचा तीव्र निषेद
भारतातील पाकिस्तान दुतावास बंद
अटारी वाघा बॉर्डर 1 मेपर्यंत बंद
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश
सरकार उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावू शकते
भारताने सिंधू पाणी करार तात्काळ लागू होण्यापासून रोखण्याची घोषणा केली.