देश-विदेश

Badrinath Glacier Collapses: बद्रीनाथमध्ये तुफान बर्फवृष्टी, हिमकडा तुटला; 55 जण अडकले

बद्रीनाथमध्ये हिमनदी फुटल्याने 55 मजूर बर्फाखाली अडकले आहेत. चमोली- बद्रीनाथ महामार्गावर काम करताना ही दुर्घटना घडली. लष्कर, ITBP, NDRF, SDRF च्या पथकांनी बचावकार्य सुरु केले आहे.

Published by : shweta walge

उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार बर्फवृष्टीनंतर हिमनदी फुटली. यामुळे ५५ कामगार बर्फाखाली गाडले गेल्याची माहिती समोर आली आहे. चमोली- बद्रीनाथ महामार्गावर काम सुरु असताना हा अपघात घडला आहे. दरम्यान बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरु आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, चमोली बद्रीनाथ धाममधील माना गावाजवळ 55 मजूर हिमनदीखाली गाडले गेले. काही मजूर स्वत: बाहेर निघाले, पण अनेक मजूर त्यामध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या वाहनांना जाण्यासाठी रस्त्यावरील बर्फ हटवणारे 55 मजूर घटनास्थळाजवळ असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत अद्याप कुठलीही मनुष्यहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. लष्करासोबतच ITBP, NDRF, SDRF च्या बचाव पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, चमोलीच्या वरच्या भागात अनेक दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हवामान खात्याने याआधीच ऑरेंज अलर्ट जारी केला होता. 3200 मीटरच्या वरच्या भागात बर्फवृष्टी होण्याचीही शक्यता होती. हिमस्खलनाची भीतीही व्यक्त करण्यात आली होती. आता बद्रीनाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर महामार्गाजवळ हिमस्खलन झाले आहे. त्यात 55 मजूर अडकले. बीआरओच्या पथकांनीही हिमस्खलनाबाबत बचावकार्य सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...