अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघातात अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले. विजय रूपाणी कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते. उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानाचा भीषण अपघात झाला.
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे पार्थिव आज दुपारी कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आले होते. दुपारी दोन वाजता पार्थिव विमानाने राजकोटला पोहोचले. त्यांच्यावर शासकीय इतमामात संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार केले गेले . डीएनए टेस्ट मॅच झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव कुटुंबियांच्या ताब्यात सोपवण्यात आलेलं होत. रुपाणी हे एअरइंडियाच्या त्याच अपघातग्रस्त विमानाने लंडनला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात होते. मात्र टेकऑफ नंतर या प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने ते कोसळले होते. राजकोट आणि गांधीनगर येथे शोकसभांचे आयोजन केले गेले आहे.
पत्नी अंजली रूपाणी भावुक
अंतिम प्रवासापूर्वी विजय रुपाणी यांच्या पत्नी अंजली रुपानी यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून अश्रूंनी निरोप दिला. यादरम्यान, रुपानी यांच्या पत्नी खूप भावनिक झाल्या आणि आपल्या मुलाला मिठी मारून आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली. माजी मुख्यमंत्र्यांच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक उपस्थित होते त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
गुजरातमध्ये राजकीय दुखवटा
आज विजय रूपाणि यांच्या अंत्यसंस्कारा निमित्त गुजरातमध्ये राजकीय दुखवटा पाळल्या जाणार आहे. गुजरात चे सीएम भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते हे विजय रूपाणी यांच्या अंतिम यात्रेमध्ये सहभागी झाले. विजय रूपाणी यांच्या अंतिम दर्शनासाठी लोकांची गर्दी जमा झाली. यावेळी त्यांच्या पार्थिव शरीराला "गार्ड ऑफ ऑनर" दिले गेले. गुजरात चे गृह मंत्री हर्ष संघवी , केन्द्रीय जल मंत्री , स्वास्थ्य मंत्री यांच्यासोबत अनेक भाजप नेते आणि कार्यकर्ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या अंतिम यात्रेच्या प्रवासात सहभागी झाले.
मुलगा ऋषभ रूपाणी यांनी मानले आभार
राजकोट च्या रामनाथपारा स्मशानघाटात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासमवेत विविध राज्याचे मुख्यमंत्री पण या अंतिम यात्रेच्या प्रवासात सहभागी झाले. यावेळी विजय रूपाणी यांचा मुलगा ऋषभ रूपाणी यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. हे केवळ आमच्या परिवारासाठी नाही तर त्या 270 परिवारांसाठी मोठी दुःखद घटना आहे जे लोक या विमान अपघातामध्ये मृत्युमुखी पडले. या दुःखद घटनेमध्ये पोलिस, आरोग्य यंत्रणा, सिव्हिल डिफेन्स, फायर सर्व्हिसेस आणि आरएसएस या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच पीएम मोदी, सीएम भूपेंद्र पटेल हे सुद्धा आमच्या पाठीशी या कठीण काळात उभे राहीले त्यामुळे त्यांचे ही ऋषभ रूपाणी यांनी आभार मानले.