अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लंडनला जाणारे विमान जमिनीवर कोसळले. विमान आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले आणि काही क्षणातच सर्व काही संपले. अहमदाबाद-लंडन एअर इंडियाच्या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते, त्यापैकी 169 भारतीय, 73 ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह सर्व 241 जणांचा मृत्यू झाला आहे, तर फक्त एक प्रवासी सुखरूप बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी त्यांच्या पत्नी अंजली आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. विमान अपघाताची बातमी मिळताच विजय रुपानी यांच्या घराभोवती शांतता पसरली. शेजाऱ्यांनी त्यांच्या घराजवळील मंदिरात प्रार्थना करण्यास सुरुवात केली. सध्या रुपानी कुटुंबाकडून कोणतेही निवेदन आलेले नाही आणि घरात कोणीही उपस्थित नसल्याची माहितीदेखील समोर आली आहे.