एअरइंडियाचे ड्रीमलायनर विमान बोईंग 787 दिल्लीहून अहमदाबाद मार्गे लंडन ला जात असताना काल अचानक क्रॅश झाले.विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हे विमान क्रॅश झालं असल्याची माहिती आहे .यामध्ये सुमारे २७२ प्रवासी प्रवास करत होते यापैकी २४१ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला तर केवळ नशीब बलवत्तर म्हणून एक व्यक्ती जिवंत राहिला असून त्यावर इस्पितळात उपचार सुरु आहेत. मात्र या दुर्घटनेमध्ये आता अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या पांड्या दाम्पत्यांचा ही दुर्दैवी अंत झाला आहे. आपल्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी जाणाऱ्या या दाम्पत्याचा विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झाला आहे.
पांड्या दाम्पत्यांची दोन्ही मुले एक मुलगा आणि एक मुलगी दोघे लंडनला राहतात. दोन्ही मुले तिथे शिकत असून जॉब ही करतात. मुलीचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून मुलीचा दीक्षांत समारंभ लंडन ला होता. आणि त्या निम्मित मुलीला सरप्राईज देण्यासाठी त्यांचे आई वडील लंडन ला जात होते. आपले आई वडील लंडन ला येणार आहेत याची कोणतीच कल्पना त्यांच्या मुलीला नव्हती. मात्र त्यांचा मुलाला याबाबत पूर्ण माहिती होती.
पांड्या दाम्पत्य काल एअरइंडिया च्या विमानात बसल्यावर त्यांनी एक सेल्फी काढला आणि त्यांनी आपल्या मुलाला पाठवला होता. विशेष म्हणजे त्यांनी लंडन ला जात असल्याची कोणतीच माहिती त्यांच्या नातेवाईकांना ही न्हवती. मुलीच्या दीक्षांत समारंभाला जाऊन या दोघांना आपल्या मुलीला आश्चर्यचकित करायचे होते. मात्र ते मुलीकडे पोहोचण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
अहमदाबादवरुन लंडन ला जाणाऱ्या एअरइंडिया च्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये हे दांपत्य मृत्युमुखी पडले. .या वेळी त्यांनी विमानात बसून जी सेल्फी काढली आणि आपल्या मुलाला पाठवली दुर्दैवाने ही त्यांची शेवटची सेल्फी ठरली. यासंदर्भात आता त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट च्या चाचणीनुसार त्याचा रिपोर्ट आल्यानंतर च नातेवाईकांना त्यांचे मृतदेह सोपवले जाणार आहेत.