एअरइंडियाचे ड्रीमलायनर विमान बोईंग 787 दिल्लीहून अहमदाबाद मार्गे लंडन ला जात असताना अचानक क्रॅश झाले.विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हे विमान क्रॅश झालं असल्याची माहिती आहे. यामध्ये सुमारे 242 प्रवासी प्रवास करत होते. टेक ऑफ नंतर 10 मिनिटांमध्येच हे विमान रहिवाशी भागात क्रॅश झाले त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेमध्ये आता पर्यंत अनेक जण मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील याच विमानामध्ये प्रवास करत होते ते सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या अचानक घडलेल्या अपघातामुळे संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे . बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
या विमानप्रवासात 52 ब्रिटिश लोक ही प्रवास करत होते. या अपघातानंतर अनेक नेत्यांचे याबाबत प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अपघाताबद्दल पाकिस्तानचे माजी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी पण ही अत्यंत दुःखद घटना असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या अपघाताबद्दल एक्स वर आपल्या भावना व्यक्त करत "भारतातील लोकांबद्दल मनापासुन माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि ही जी घटना घडली ती खुप दुःखद आहे " अश्या शब्दात त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या दुःखद घटनेवर भारताचे पंतप्रधान यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज अहमदाबाद मध्ये जी घटना झाली त्यामुळे आपण स्तब्ध आणि खूप दुःखी असून ही एक अशी भयावह घटना आहे जी शब्दात मांडता येऊ शकत नाही", असे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच बरोबर जे लोक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत त्यांच्यासाठी योग्य ती यंत्रणा कार्यरत आहे कि नाही या बाबत अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत असे ही ते यावेळी म्हणाले.
तसेच ब्रिटिश प्रधानमंत्री किर स्टार्मर यांनी ही या प्रसंगावर आपले मत व्यक्त करत सांगितले की हे दृश्य खूप भयावह आहे. मला तिथल्या प्रत्येक घटनेची माहिती दिली जात आहे. या दुःखद समयी मी जखमी लोक आणि त्यांच्या परिवारासोबत आहोत. अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.