हरियाणातील प्रसिध्द युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि तिच्या ग्रुपमधील 5 ते 6 सदस्यांना, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा 2023 मध्ये पाकिस्तानलाही गेली होती. व्हिसा मिळविण्यासाठी ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती जिथे ती पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी- एहशान उर रहीम- उर्फ दानिशच्या संपर्कात आली, नंतर ती त्याच्याशी बोलू लागली. तिचे त्याच्याशी संबंध आले.
त्यानंतर ती त्याचा ओळखीचा अली अहवान याला भेटली. तसेच ती शाकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटला. तिने शाकीरचा मोबाईल नंबर जाट राधवा या नावाने आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. ती भारतात आल्यानंतर व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्या सर्वांशी सतत संपर्कात राहिली आणि तेव्हापासून तिने देशविरोधी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचा गुन्हा केला असून भारत सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली पर्सोन-नॉन-ग्राटा घोषित केले आहे. ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील प्रसिध्द युट्यूबर आहे, जी ट्रॅव्हल चॅनल चालवते. तिच्या युट्यूब चॅनेलचे नावा 'ट्रॅव्हल विथ-जो' असे आहे. यादरम्यान ती पाकिस्तानला होती एवढचं नव्हे तर तिने तिथे अनेक गुप्त माहिती दिली होती.