President Droupadi Murmu 
देश-विदेश

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टर उतरताच हेलिपॅड खचले, थोडक्यात टळली दुर्घटना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत केरळमध्ये एक मोठी दुर्घटना होता-होता टळली

  • हेलिपॅडवर हेलिकॉप्टरच लँडिंग होताच चाक रुतलं

(President Droupadi Murmu) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत केरळमध्ये एक मोठी दुर्घटना होता-होता टळली आहे.

पत्तनामथिट्टाच्या प्रमदम स्टेडियमच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरच लँडिंग होताच त्याचे चाक रुतलं.या घटनेमुळे एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून हेलिकॉप्टरचा रुतलेला भाग बाहेर काढण्यात आला.

एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या वजनाने हेलिपॅडचा एक भाग जमिनीत रुतल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टरला ढकलत पुढे हलवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा