चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. पोलीस आणि प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. 30 एप्रिलपासून चार धाम यात्रा सुरू झाली असून चारधाम यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात.
सध्या पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे हेलिकॉप्टर एका प्रायव्हेट कंपनीचे असल्याचे समजते आहे. हे हेलिकॉप्टर उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगनानी येथे कोसळले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाकडून घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. यातच हवामान खात्याने आज उत्तराखंडमधील हवामानाबाबत इशाराही जारी केला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.