अमेरिकेत सध्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत. अमेरिकेत वस्तूंना मोठी सेल लागल्याप्रमाणे तेथील लोकांची दुकानांच्या बाहेर तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. मात्र हे सगळ कशामुळे अमेरिकेत नेमकं असं काय घडलं की, खाण्याच्या, घरगुती वस्तूंच्या तसेच इतर गरजेच्या वस्तू अशा प्रत्येक गोष्टींसाठी ग्राहकांची झुंबड उडाली पाहायला मिळत आहे. खरं तर यामागचं कारण आहे ट्रम्पने केलेली ती एक घोषणा. त्या घोषणेमुळे अमेरिकेत गरजेच्या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकच नव्हे तर दुकानदार देखील घाई करत आहेत.
ट्रम्पने केलेली घोषणा काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 एप्रिलपासून रेरिप्रोकल टॅक्स लागू होणार अशी घोषणा केली आहे. ज्यावेळी टॅरिफ लागू होईल त्यानंतर आयात होणाऱ्या प्रत्येक वस्तूचा भाव रातोरात 35 ते 40 टक्क्यांनी वाढणार आहेत. यामुळे गरजेच्या तसेच इतर वस्तू जास्त किंमतीत विकल्या जाणार आहेत. त्यामुळेत टॅरिफ लागू होण्याआधी अमेरिकेत प्रत्येक दुकानासमोर लोकांची मोठी गर्दी जमा झालेली पाहायला मिळत आहे. तसेच या गोष्टीचा फायदा केवळ ग्राहकच नव्हे तर दुकानदारही घेत आहेत. कमी किंमतीत मिळणाऱ्या वस्तूंचा साठा करण्यासाठी दुकानदारही मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करत आहेत.
'या' गोष्टींची मोठ्या प्रमाणात मागणी
लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅब्लेट सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच परदेशी कंपन्यांचे फ्रिज,वॉशिंग मशीन, डिश वॉशर अशा ज्या अमेरिकेबाहेर बनविण्यात आल्या आहेत त्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्याचसोबत ट्रेड मिल, मसाज चेअर आणि घर निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तूंनाही मोठी मागणी आली आहे. तसेच कार आणि व्यावसायिक वाहने महाग होणार आहेत यामुळे वाहन कंपन्यांच्या शोरुममध्येही गर्दी होत आहे.
भारतासह अनेक देशांवर लादले टेरिफ
व्यापार क्षेत्र समतोल राखण्यासाठी अमेरिकेने भारतासोबतच इतर काही देशांवर टेरिफ लादलेले आहे. ट्रम्पच्या टॅरिफ घोषणेला प्रत्यूत्तर म्हणून चीनसारख्या देशांनीही टॅरिफ वॉर सुरु केले असून चिनी उत्पादने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत. मात्र यामुळे जागतिक अर्थव्यवस्था वर्षाच्या शेवटी 50 ते 60 टक्क्यांनी मंदीत जाण्याची शक्यता जे पी मॉर्गन यांनी लावली आहे. यामुळे जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे.