देश-विदेश

IMF Approves Loan Pakistan : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला IMFकडून मदत! भारताकडून तीव्र निषेध

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयएमएफकडून पाकिस्तानला एक दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केला आहे.

Published by : Prachi Nate

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात तणावपुर्ण वातावरण निर्माण झालं आहे. याचदरम्यान भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात केली आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान युद्धामध्ये अधिक काळ तग धरु शकेल याचीदेखील शक्यता खूप कमी दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर आयएमएफ बोर्डाची शुक्रवारी एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी कर्ज कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली, ज्यामध्ये भारताने आपला निषेध नोंदवला.

यावर पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर न करण्याची मागणी भारताने केली होती. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या महत्त्वाच्या बैठकीत मतदानाचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागल्यामुळे आयएमएफने भारताच्या मागणीला डावलून लावले, आणि पाकिस्तानला युद्धाच्या तोंडावर IMF ने एक दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केले. आयएमएफकडून पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8,500 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या महत्त्वाच्या बैठकीत ज्यावेळे या कर्जादरम्यान मतदान सुरु होते त्यावेळेस भारत मतदानापासून दूर राहिला. ज्यामुळे मतदानाचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागला. यादम्यान भारताकडून या प्रस्तावाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. जबाबदार सदस्य देश म्हणून पाकिस्तानचा मागील खराब रेकॉर्ड पाहता भारताने आयएमएफ कार्यक्रमांवर चिंता व्यक्त केली.

याचपार्श्वभूमीवर भारताने निषेध करत म्हटलं की, "आयएमएफकडून पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या कर्जाचा पाकिस्तान दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी गैरवापर करु शकतो". तसेच पुढे असं म्हटलं आहे की, "बैठकीत पाकिस्तानसाठी नवीन लवचिकता आणि स्थिरता सुविधा (RSF) कर्ज कार्यक्रमवर देखील विचार करण्यात आला. सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना सतत बक्षीस देणे जागतिक समुदायाला धोकादायक संदेश देत आहे. तसेच यामुळे निधी देणाऱ्या संस्था आणि देणगीदारांची प्रतिष्ठा धोक्यात येते आणि जागतिक मूल्यांची थट्टा होते".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा