सध्या सुरु असलेल्या इराण-इस्त्रायल यांच्या युद्धाने वेगळ वळण घेतलं आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र, बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहेत. नुकताच इस्त्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले आहे. साऊथ पार्स गॅस फिल्ड हे एक वायू निर्माण करणारे ठिकाण आहे, जे इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात नष्ट झालं आहे. ज्याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होण्याची शक्यता आहे. .
हे सगळ सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपला टेंभा मिरवला आहे. तर दुसरीकडे इस्त्रायलसोबत सुरु असलेल्या युद्धाला पुर्णपणे अमेरिकेला जबाबदार ठरवलं आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी मोठा दावा केला. ज्याप्रमाणे मी भारत-पाकिस्तान वाद मिटवला त्याचप्रमाणे इराण-इस्त्रायल यांच्यामध्ये देखील मध्यस्थी करेन. तसेच मी खूप काही करत असतो परंतु कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही. असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्त्रायल युद्धपार्श्वभूमीवर म्हटलं की, " मी भारत पाकिसातनमध्ये मध्यस्थी केली त्याचप्रमाणे मी इराण-इस्त्रायल यांच्यामध्ये देखील करार करण्यास मदत करेन. मी याआधी देखील सर्बिया आणि कोसोवो यांच्यात कित्येक वेळा मध्यस्थी केली आहे. इतकचं नव्हे तर मिस्त्र आणि इथियोपिया यांच्यात एका मोठ्या धरणावरून वाद होता ज्याचा परिणाम नील नदीवर होताना पाहायला मिळत होता. मात्र यावेळी ही मी ते रोखले आणि आता दोन्ही देशांमध्ये सामंजस्य आणि शांतता आहे.
त्याचप्रमाणे मी इराण आणि इस्त्रायल या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करून त्यांच्यात सुरु असलेल्या ताणावावर लवकरात लवकर योग्य तो उपाय शोधून काढेन". त्याचसोबत पुढे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, " मी खूप काही करत असतो परंतु कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही. हा ते लोकांना कळते. मात्र बायडन यांच्या काही मुर्ख निर्णयामुळे अनेकवेळा नुकसान भोगावे लागले. मात्र माझ्यात तेवढी क्षमता आहे. मी सगळ सुरळीत करेन.