पाकिस्तानला भारताने सळो की पळो करून सोडले आहे. भारताने पाकिस्तानमधील 15 शहरांवर हल्ले गेले आहेत. भारताने पाकिस्तानवर ड्रोन आणि मिसाईलचा आक्रमक मारा केला आहे. त्या नंतर पाकिस्तानमध्ये ब्लॅकआऊट केला गेला. त्यानंतर भारतातदेखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
शाळा - महाविद्यालय बंद :
भारताने सीमावर्ती भागात ब्लॅकआऊट केला गेला. पंजाब, अंबाला, राजस्थान आणि हरियाणातील गावांना ब्लॅक आऊट करण्यास सांगितले गेले. तसेच सायरन वाजताच प्रतिसाद देऊन ब्लॅकआऊट करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर पंजाब, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी आता सरकारी अधिकारी तसेच पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पंजाबमध्ये याआधीच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या शाळा आणि महाविद्यालय राज्यातील सीमावर्ती जिल्हे फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, गुरदासपूर आणि अमृतसर येथे स्थित आहेत. या शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता हा आदेश संपूर्ण पंजाब राज्यात लागू करण्यात आला आहे.
भारतातील विमानतळं बंद :
भारताने खबरदारीचा उपाय म्हणून देशातील एकूण 27 विमानतळे बंद केली आहेत. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवल्या गेल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत विमानतळे बंद राहणार आहेत.