देश-विदेश

IND-PAK War : पाकिस्तानला युद्ध पडलं महागात ! आतापर्यंत किती नुकसान ? आकडा समोर

या ड्रोन हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान पाकिस्तानचं किती नुकसान झालं, याचा आकडा आता पहिल्यांदा समोर आला आहे.

Published by : Shamal Sawant

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'मधून सडेतोड उत्तर दिले आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ले करण्यास सुरुवात केली. सलग तीन दिवस भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असतानाच काल संध्याकाळी अमेरिकेच्या पुढाकाराने दोन्ही देशांनी युद्धविराम देण्याचा करार करण्याची घोषणा केली. मात्र अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने लायकी दाखवली आहे.

भारत आणि पाकिस्तान युद्धविराम झाल्यानंतर अवघ्या चार तासांतच जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्याची वेळ आली. पाकने दोन्ही देशांमधील शस्त्रसंबंधी कराराला काही तास उलटण्यापूर्वीच पाकने या कराराचे उल्लंघन केले आहे. पाकने फायरिंग सुरु केल्याने जम्मू, काश्मीर, पंजाब, राजस्थानमध्ये ड्रोन्स दिसल्याची माहिती समोर आली. पंजाबच्या नऊ शहरात संपूर्णपणे ब्लॅकआऊट करण्याची वेळ आली आहे. मात्र आशामध्येही भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारतानं देखील प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर हल्ला केला, या ड्रोन हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान पाकिस्तानचं किती नुकसान झालं, याचा आकडा आता पहिल्यांदा समोर आला आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार,पाकिस्तानचे सात एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. यामध्ये पाच एअरबेस आणि दोन रडारचा समावेश आहे. यामध्ये नूर खान एअरबेस, रावळपिंडी एअरबेस, रहमियार खान, मुस्तफाबाद, मुरीद, रफीकुई एअरबेस यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमानांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अनेक ड्रोनचे लाँचंपॅड देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. हजारो कोटी रुपयांच्या शस्त्रांचं नुकसान झालं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा