देश-विदेश

Mehbooba Mufti On India-Pakistan war : भारताने केलेल्या हल्ल्यानंतर मेहबूबा मुफ्ती रडल्या, म्हणाल्या, "आमच्या मुलांना का मारले जात आहे?"

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Published by : Shamal Sawant

जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी सैन्य सामान्य लोकांना लक्ष्य करून गोळीबार करत आहे. तथापि, भारतीय लष्करही पाकिस्तानच्या चिथावणीखोर कारवायांना योग्य उत्तर देत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दोन्ही बाजूंनी लोक मरत आहेत :

मुफ्ती म्हणाल्या की, "सध्याच्या तणावामुळे आपल्या लोकांना त्रास होत आहे. दोन्ही बाजूंनी संयम बाळगण्याची आणि तणाव कमी करण्याची वेळ आली आहे कारण निष्पाप लोक मारले जात आहेत. जर तणाव असाच राहिला तर हा संघर्ष संपूर्ण जगाला वेढून टाकेल. लष्करी कारवाई हा कोणत्याही गोष्टीवर कायमचा उपाय नाही. आपण हा प्रश्न राजकारणाच्या माध्यमातून सोडवला पाहिजे. यामध्ये दोन्ही बाजूंनी लोक मरत आहेत.

नंतर त्या म्हणाल्या की, ''जम्मू आणि काश्मीरचे लोक असे किती काळ मरत राहतील?'' आमच्या मुलांना का मारले जात आहे, त्यांचे रक्त का सांडले जात आहे? दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी हे चर्चेद्वारे सोडवावे. दोन्ही बाजूंच्या पंतप्रधानांनी हे चर्चेद्वारे सोडवावे.दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत, देव करो, जर अण्वस्त्रांचा वापर झाला तर कोणीही वाचणार नाही."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते