देश-विदेश

Pahalgam Attack : बदला घ्या ! कारवाई करण्याची सैन्याला मुभा ; पंतप्रधान मोदी यांचे तीनही सैन्यदलांना निर्देश

या बैठकीमुळे भारताकडून काहीतरी मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी रणनीती आखल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, सीडीएस अनिल चौहान, आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते.

एनएसजी, बीएसएफ, सीआरपीएफ आणि सशस्त्र सीमा दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीमुळे भारताकडून काहीतरी मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी सैन्यदलाबद्दल मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी टार्गेट निवडावे आणि कारवाई करावी असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर द्या असंही पंतप्रधानांनी सैन्याच्या तीनही दलांना सांगितलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा