देश-विदेश

Youtube : भारतातील कंटेन्ट क्रिएटर्सने गेल्या तीन वर्षात कमावले तब्बल 21000 कोटी रुपये

मीडिया कंपन्यांच्या वाढीला गती देण्यासाठी 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

Published by : Shamal Sawant

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हिडीओसाठी यूट्यूब हे महत्त्वाचे माध्यम आहे. आता युट्यूब संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube ने भारतीय कंटेंट क्रिएटर्स, कलाकार आणि मीडिया कंपन्यांच्या वाढीला गती देण्यासाठी 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नील मोहन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत, YouTube ने भारतातील निर्माते, कलाकार आणि मीडिया कंपन्यांना 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. गेल्या वर्षी, भारतात तयार केलेला व्हिडिओ कंटेंट देशाबाहेरील प्रेक्षकांनी 45 अब्ज तास पाहिला.

त्याचप्रमाणे "भारतीय निर्माते, कलाकार आणि मीडिया कंपन्यांच्या वाढीला गती देण्यासाठी YouTube पुढील दोन वर्षांत 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करेल," असे मोहन यांनी येथे जागतिक ऑडिओव्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES) च्या उद्घाटन दिवशी आयोजित एका सत्रात सांगितले.

गेल्या वर्षी, देशातील 10 कोटींहून अधिक चॅनेल्सनी YouTube वर कंटेंट अपलोड केला होता, त्यापैकी 15000 हून अधिक चॅनेल्सचे सबस्क्राइबर 10 लाखांहून अधिक होते. अशी माहितीदेखील मोहन यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा