India Pakistan War 
देश-विदेश

India Pakistan War: भारत - पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांना दिल्या 'या' महत्वाचा सूचना

भारतीय नौदलाकडून समुद्रात 'शूट टू किल'ची ऑर्डर

Published by : Siddhi Naringrekar

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. 7 मे रोजी भारताने दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त केल्यांनतर आता पाकिस्तान आणि भारतातला (India-Pakistan War ) तणाव वाढताना दिसत आहे. (India-Pakistan War)

पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. (India-Pakistan War) भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले.

भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला असताना मुंबईतील मच्छिमारांना भारतीय नौदलाकडून महत्वाच्या सूचना देण्यात आला आहे. मुंबईच्या किनारपट्टी भागात सुरक्षेत वाढ करण्यात आली असून संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहेत.

भारत व पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील किनारपट्टी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, समुद्रमार्ग यांसह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवण्यात आले आहे. यासोबतच बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून 'सागरी कवच' ही व्यापक तटरक्षक मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत असून मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. संशयित व्यक्ती समुद्रामार्गे प्रवेश करू नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे.

भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छिमारांनी दक्षता ठेवण्याची सूचना सुरक्षा यंत्रणांकडून मत्स्यव्यवसाय विभागाला या सूचना देण्यात आल्या

भारतीय नौसेनेकडून समुद्रात ODA (ऑफशोअर डिफेन्स एरिया) या क्षेत्रात मच्छिमारांना मासेमारी करता येणार नाही.

या क्षेत्रात बोटी आढळ्यास 'शूट-टू-किल' चे आदेश देण्यात आले आहेत.

कारण देशाची सागरी सुरक्षेची जबाबदारी मच्छिमारांवर सुद्धा असल्याने या कठीण परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांना आणि प्रशासनांना सहकार्य करावे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Ganpati Visarjan 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्याची विसर्जन मिरवणूक संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'निरोप घेतो आता आज्ञा असावी..., 33 तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Thane : ठाणेकरांना खुशखबर! मुंबई मेट्रो-11 प्रकल्पाला मंजुरी; ठाणे ते गेटवे प्रवास होणार अधिक सुलभ

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाची शेवटी आरती संपन्न; नऊ तासांच्या प्रयत्नानंतर राजा आता विसर्जनासाठी सज्ज