देश-विदेश

India-Pakistan : पाकिस्तानमध्ये अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु! भारताचा युद्ध सराव, पाकड्यांना फुटला घाम

पाकिस्तानमध्ये राजीनाम्यांची लाट: भारतीय युद्ध सरावामुळे पाकिस्तानी लष्करात खळबळ, अधिकारी आणि सैनिकांची मोठ्या प्रमाणात राजीनामे.

Published by : Prachi Nate

जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर भारतीय सरकार पाकिस्तान विरोधात रोज काही ना काही कठोर पाऊले उचलताना दिसत आहे. भारताने सिंधू कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानने या कारवाईकडे युद्ध म्हणून बघितले जाईल असा इशारा दिला. यानंतर भारताची लष्करी क्षमता सतत वाढताना पाहायला मिळत आहे. अशातच भारताने युद्धसराव सुरू केल्यावर पाकिस्तानी लष्करात खळबळ माजली आहे.

पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात राजीनामासत्र सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत 250 अधिकारी, 1200 हून अधिक सैनिकांनी राजीनामा दिल्या असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोअरप्रमुखांचं लष्करप्रमुख मुनीरांना पत्र गेल्याची बातमी सध्या समोर आली आहे.

पाकिस्तानी लष्कराचं गोपनीय पत्र व्हायरल झाल्याने सध्या खळबळ माजली आहे. भारताशी निर्माण झालेल्या तणावावर ठोस धोरण नसल्याची तक्रार करत हे राजीनामा देत असल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तानी लष्कराच्या डीजीआएसपीआरचं तंबी देणारं पत्रही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा