देश-विदेश

Iran Attack On Mossad : इराणचा थेट इस्रायल गुप्तचर संघटनेच्या मुख्यालयावर हल्ला ; इस्रायल काय देणार प्रत्युत्तर ?

इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायली गुप्तचर यंत्रणेवर संकट

Published by : Shamal Sawant

इस्रायलने इराणविरुद्ध निर्णायक विजय मिळवल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. शुक्रवारच्या युद्धाच्या पहिल्या दिवशी इस्रायलने इराणच्या लष्करप्रमुखांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठार मारले असते. इस्रायली लष्कराने मंगळवारी दावा केला की इराणच्या सशस्त्र दलांचे नवनियुक्त चीफ ऑफ स्टाफ आणि वरिष्ठ लष्करी कमांडर अली शादमनीला संपावल्या यांचे पाच दिवसांत दुसऱ्यांदा निधन झाले आहे. हा इराणसाठी मोठा धक्का आहे. शादमानी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे जवळचते सैन्य सल्लागार होते.

अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता इराणने इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला आहे. इस्रायलने गुरुवारी रात्रीपासून इराणमधील सैन्याची ठिकाणं, अण्वस्त्र तळ तसेच बड्या लष्कर अधिकाऱ्यांना संपवण्याचे मिशन सुरु केले होते. त्यानंतरच इराणने इस्रायलला चोख प्रत्युत्तर देत मोसादवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे या हल्ल्यामध्ये मोसाद पूर्ण नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच आता या हल्ल्याला इस्राइल काय उत्तर देणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये कडवी झुंज असलेली बघायला मिळत आहे. इराणवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आहे. मात्र इराणकडे मिसाईल आणि ड्रोन तंत्रज्ञान प्रगत आहे. त्यामुळे यामार्गे इराण इस्रायलशी लढा देऊ शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा