जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, "आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे", असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पुढे लिहिले की, माझ्या कार्यकाळात आमच्यात विकसित झालेल्या आनंददायी आणि अद्भुत कामकाजाच्या संबंधांबद्दल आणि देशाच्या राष्ट्रपतींनी दिलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य अमूल्य आहे. माझ्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो आहे.
जगदीप धनखड यांनी पत्रात लिहिले आहे की, संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेला कळकळ, विश्वास आणि प्रेम माझ्या आठवणीत कायम राहील. देशाच्या महान लोकशाहीमध्ये उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अमूल्य अनुभवांबद्दल आणि अंतर्दृष्टीबद्दल मी मनापासून आभारी आहे.
पुढे त्यांनी लिहिले की, "या महत्त्वाच्या काळात देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि अभूतपूर्व विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे ही माझ्यासाठी खूप मोठी सौभाग्य आणि समाधानाची गोष्ट आहे.
आपल्या पदाचा राजीनामा देताना त्यांनी म्हटले आहे की, देशाच्या इतिहासाच्या या परिवर्तनकारी काळात सेवा करणे हा माझ्यासाठी खरा सन्मान आहे. या प्रतिष्ठित पदाचा निरोप घेताना, भारताच्या जागतिक उदयाचा आणि अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. मला त्यांच्या उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास आहे. मनापासून आदर आणि कृतज्ञता...