देश-विदेश

Ind Vs Pak : देशात 7 मे रोजी अलर्ट ! गृहमंत्रालयाचे निर्देश ; भारत-पाकिस्तान युद्धाची तयारी?

1971 च्या युद्धानंतर पाहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम येथे झालेल्या दहाशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरू केली आहेत. अशातच आता भारत सरकारकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयाने सोमवारी अनेक राज्यांना 7 मे रोजी नागरी सुरक्षा मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

या आयोजित केलेल्या मॉक ड्रिलमध्ये निवडक भागांमध्ये हवाई हल्ल्याची धोक्याची सूचना देणाऱ्या सायरनची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच नागरिक आणि विद्यार्थ्यांचादेखील समावेश असणार आहे. यावेळी हवाई हल्ले किंवा बॉम्बस्फोट झाले तर आशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसा प्रतिसाद द्यायचा? याबद्दलचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्याचप्रमाणे स्थलांतरण योजना तयार केली जाईल आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांची वेळेवर आणि योग्य हालचाल यासाठी रंगीत तालिमदेखील केली जाईल. दरम्यान याबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार, आगामी सुरक्षा मॉक ड्रिल हा एक तयारीचा भाग असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. अनेक नागरिकांनी आणि तरुण पिढीतील सदस्यांनी युद्धाची प्रत्यक्ष परिस्थिती कधीही अनुभवलेली नाही. हवाई हल्ले किंवा स्थलांतरणाच्या परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे ? याबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी अशा उपाययोजना उपयुक्त ठरतील.

या मॉक ड्रिलमध्ये कशाचा समावेश असणार ?

- हवाई हल्ल्याचा इशारा मिळताच तत्काळ सायरन वाजवणे

- विद्यार्थी, नागरिकांना आशा परिस्थितीमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे ? याबद्दलचे प्रशिक्षण

- हल्ल्याच्या वेळी Black Out करणे

- लोकांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे (Evacuation Planning) याची योजना आखणे आणि सराव करणे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकारचा देशव्यापी नागरिक सुरक्षा सराव याआधी 1971 साली केला गेला होता. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर सरकारकडून मिळालेले निर्देश हे गंभीर आहेत असे म्हंटले जात आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होणार की काय? असा प्रश्न आता भारतातील जनतेला पडला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात