देश-विदेश

Pahalgam Attack : काश्मीरमधील 'या' पर्यटन स्थळांवर 'No Entry'

मात्र अशातच आता जम्मू काश्मीर सरकारने मोठा निर्णय घेलया आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामध्ये 26 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचप्रमाणे अनेक पर्यटकांनी काश्मीरला जाणे रद्ददेखील केले. मात्र अशातच आता जम्मू काश्मीर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

काश्मीरमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील भागातील 87 पैकी 48 पर्यटनस्थळे बंद केली आहेत. त्याचप्रमाणे ट्रेकिंग ट्रेल्सदेखील बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,गुरेझ व्हॅली, दूधपथरी, वेरीनाग, बंगस व्हॅली आणि युसमार्ग सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे. पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही पर्यटन स्थळे तात्पुरती बंद आहेत आणि सुरक्षेच्या परिस्थितीनुसार त्यांचा आढावा घेतला जाईल.

त्याचप्रमाणे, सुरक्षा दलांनी गुलमर्ग, सोनमर्ग आणि दाल लेक परिसरांसह संवेदनशील पर्यटन स्थळांवर सुरक्षा तैनात केली आहे. यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपमधील अँटी फिदायीन पथके तैनात केली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू