पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला. पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याचप्रमाणे 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केले. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे. सीमेवर कारवाई सुरु असतानाच आता पाकिस्तानने भारताला पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तानने आता भारतावर सायबर अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात आता सायबर सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तान-समर्थित हॅकर गट, जसे की पाकिस्तान सायबर फोर्स आणि एपीटी ३६ हे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे मालवेअर पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
कोणती काळज घ्याल ?
-अज्ञात लिंक्स आणि फाइल्स उघडू नका.
-2 फॅक्टर अॅथोंटिकेशन नेहमी चालू ठेवा.
-तुमचे पासवर्ड सुरक्षित ठेवा.
-मॉल्स किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरणे टाळा.
-डिव्हाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा
-आधार, पॅन क्रमांकसह वैयक्तिक तपशील अनोळखी व्यक्तीस शेअर करू नका.