देश-विदेश

Pahalgam Attack : "...तर हल्ला आधीच झाला असता", संजय राऊत यांच्या मुलाचा दावा

संजय राऊत यांच्या मुलाने हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा नाहक बळी गेला. यानंतर हल्ल्यादरम्यानचे अनेक व्हिडीओदेखील समोर आले आहेत. अनेक नागरिक त्या हल्ल्याबद्दल आलेल्या भयानक अनुभवाबद्दल सांगतानादेखील दिसत आहेत. अशातच आता जालना येथील संजय राऊत यांच्या मुलाने हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे.

जालना येथे राहणारे संजय राऊत यांचा मुलगा आदर्श राऊत आणि त्याची बायको काश्मीरला गेले होते. त्यावेळी आलेला अनुभव आदर्श राऊत यांनी सांगितला आहे. आदर्श म्हणाले की, घोडेस्वारीसाठी पहलगामला गेले असता एका अनोळखी व्यक्तीने संवाद साधला. तुम्ही काश्मिरी वाटत नाही असं तो व्यक्ती म्हणाला. तुम्ही हिंदू आहात का? अशी विचारणादेखील केली. त्यावेळी संशय आला आणि काश्मीरचा रहिवासी असल्याचे सांगितले".

पुढे आदर्श राऊत म्हणाले की, "21 एप्रिललादेखील ते रहिवासी पहलगाममध्येच होते. मात्र त्यावेळी तिथे पर्यटक कमी होते. त्यामुळे त्यांनी दूसरा दिवस निवडला असावा. ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे पोलीस किंवा सुरक्षा दल नव्हते. तिथे सुरक्षादल असते तर हल्ला झाला नसता".

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे फोटो समोर आले. तेव्हा आदर्शनं त्यातील एकाला ओळखलं. जालन्याला परतल्यानंतर आदर्शनं ईमेलच्या माध्यमातून ही माहिती NIA ला दिली. त्यात त्यांनी संशयितासोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Team India's New Jersey Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवर 'ड्रीम 11' नाही तर आता ही स्पॉन्सर म्हणून दिसणार 'ही' कंपनी

Dhanashree Verma : घटस्फोटानंतर धनश्री वर्माच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र? फोटोने वेधलं लक्ष

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा