देश-विदेश

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यादरम्याने चीनी सॅटेलाइट फोनचा वापर ; हँडलर्सबरोबर दहशतवाद्यांच्या गप्पा आणि कॉल

हा फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही परदेशी स्रोतातून भारतात तस्करी केल्याचा संशय आहे.

Published by : Shamal Sawant

काही दिवसांपूर्वी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये हिंदू निरपराध लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी NIA करत आहेत. दरम्यान, सुरक्षा एजन्सींनी एका संशयास्पद 'हुआवेई सॅटेलाइट फोन'च्या हालचालींचा मागोवा घेतला आहे. हुआवेई ही एक चिनी कंपनी आहे आणि या कंपनीच्या सॅटेलाइट उत्पादनांवर भारतात बंदी आहे. हा फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही परदेशी स्रोतातून भारतात तस्करी केल्याचा संशय आहे.

NIA चे खुलासे :

सूत्रांच्या माहितीनुसार, हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी चार वेळा संपर्क साधण्यात आला. परंतु मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने हल्ल्याचा ड्रोन वापरता आला नाही.हल्ल्यापूर्वी आणि दरम्यान किमान 10 लोक एन्क्रिप्टेड अॅप्सद्वारे त्यांच्या हँडलरशी गप्पा मारत होते आणि त्यांना कॉल करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA ने हाती घेतला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली स्थापन केलेल्या पथकाने सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.

सॅटेलाइट फोनचे वैशिष्ट्य :

या फोनमध्ये इंटरनल अँटिना आणि काही चिप्स असतात. यामुळे बाहेरील डिव्हाईस कनेक्ट करणे सोपे जाते. मात्र या फोनमध्ये चायना टेलिकॉम सीम असणे गरजेचे आहे. हा फोन कमी बँडविड्थ व्हॉइस आणि टेक्स्ट सुविधा प्रदान करतो. हा फोन सेल्युलर कव्हरेज नसलेल्या भागातही काम करतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा