काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करत 28 हिंदू नागरिकांची हत्या केली. हल्ल्यानंतर लगेचच ही जबाबदारी TRF ने स्वीकारली होती. मात्र आता एक नवीन माहिती समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये सहभाग नसल्याचे TRF ने सांगितले आहे.
TRF ने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये, TRFने म्हटले आहे की "पहलगाम घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. तो हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार देतो. टीआरएफने म्हटले आहे की हा आरोप खोटा आहे आणि काश्मिरी प्रतिकाराला बदनाम करण्याचा हा कट आहे".