देश-विदेश

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटना 'टीआरएफ'चा हात, म्होरक्या सैफुल्ला खालिद हल्ल्याचा मास्टरमाइंड

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत 28 नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना लष्कर-ए-तैयबाच्या छत्रछायेखाली कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.

या हल्ल्यामागे TRF चा प्रमुख सैफुल्ला खालिद असल्याची माहिती समोर आली आहे. तो या कटाचा मुख्य सूत्रधार असून, लष्कर-ए-तैयबाशी त्याचे जवळचे संबंध आहेत. 'सैफुल्ला कसुरी' या नावानेही तो ओळखला जातो. अशा अनेक हल्ल्यांत त्याचा सहभाग असल्याचे उघडकीस आलेला आहे.

सैफुल्ला खालिदचा पाकिस्तानातील प्रभाव इतका आहे की, सैन्याच्या काही भागांमध्येही त्याला मोकळा वावर आहे. त्याच्या सुरक्षेसाठी दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असतात. त्याचा हाफिज सईदशी घनिष्ठ संबंध असल्याचेही बोलले जाते, ज्यामुळे तो पाकिस्तानात दहशतवाद्यांमध्ये एक प्रभावशाली चेहरा मानला जातो. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, हल्लेखोऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा