देश-विदेश

Terrorist Killed : लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार

लष्करचा हा दहशतवादी भारतातील तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता.

Published by : Shamal Sawant

2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह पाकिस्तानात मारला गेला. लष्कर-ए-तोयबाशी संबंधित अबू सैफुल्लाहची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.

लष्करचा हा दहशतवादी अबू सैफुल्ला नेपाळमधून दहशतवादी नेटवर्क हाताळत होता. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मतली फालकारा चौकात अज्ञात हल्लेखोरांनी अबू सैफुल्लाहची गोळ्या घालून हत्या केली. लष्करचा हा दहशतवादी भारतातील तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता.

अबू सैफुल्ला उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​राजुल्ला निजामानी असे लष्कराच्या या दहशतवाद्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाचे संपूर्ण मॉड्यूल हाताळत असे. त्याचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कार्यकर्ते आणि आर्थिक मदत पुरवणे होते.

अबू सैफुल्ला उर्फ ​​मोहम्मद सलीमने नेपाळमध्ये आपले दहशतवादी जाळे पसरवले होते आणि तेथून तो भारताविरुद्ध दहशतवादी कट रचत असे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी अबू सैफुल्लाहला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. यामुळे तो नेपाळ सोडून पाकिस्तानात परतला. तो पाकिस्तानात राहत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली.

लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह भारतात दहशतवादी हल्ले करत असे. अबू सैफुल्ला उर्फ ​​मोहम्मद सलीमने नेपाळमध्ये आपले दहशतवादी जाळे पसरवले होते आणि तेथून तो भारताविरुद्ध दहशतवादी कट रचत असे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी अबू सैफुल्लाहला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. यामुळे तो नेपाळ सोडून पाकिस्तानात परतला. तो पाकिस्तानात राहत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा