अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये मोठ्या प्रमाणावर लागलेली आग अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आली नाही. गेल्या 8 दिवसांपासून लॉस एंजिलिसच्या जंगलात धगधगत्या आगीमुळे हजारो एकर जमिनवर प्रचंड नुकसान झालं आहे. या विध्वंसामुळे अनेक घरं आणि मालमत्ताही नष्ट झाली आहे. विशेषतः काही हॉलीवूड सेलेब्रिटींच्या घरांनाही या आगीचा तडाखा बसला आहे. या आगीमुळे अमेरिकेचं अब्जावधी डॉलरचे आर्थिक नुकसान झालं आहे. दरम्यान, लॉस एंजिलिसमधून काही धक्कादायक फोटोज आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
आग विझवण्यासाठी पिंक पावडर
लॉस एंजेलिसमधील जंगलांमध्ये लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी विमाने पिंक पावडरचा फवारा मारला जात आहे. 9 हून अधिक विमान जंगलांवर उडत आहेत आणि त्यातून पिंक पावडर आकाशात पसरत आहे. यावरून अनेक लोकांच्या मनात प्रश्न उभे राहिले आहेत की, ही पिंक पावडर नेमकी काय आहे? आणि त्याच्या मदतीने जंगलातील आग विझवता येईल का?
पिंक पावडर नेमकी आहे तरी काय?
पिंक पावडर, ज्याला फायर रिटार्डेंट म्हणून ओळखले जातं. हा एक अग्निरोधक पदार्थ आहे. यामुळे आग लागण्याची आणि जळण्याची प्रक्रिया मंदावते. ही पावडर म्हणजे एक ओलसर पदार्थ आहे. ज्यामुळे ऑक्सिजन वायूला मोठ्या प्रमाणावर ब्लॉक करता येतं. यामुळे आग जलद पसरू शकत नाही आणि अग्निशमन दलाला आग विझवण्यात मदत होते.
पिंक पावडर कशी तयार केली जाते?
फायर रिटार्डेंट किंवा पिंक पावडर तयार करण्यासाठी अनेक प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामध्ये पानी, अमोनियम सल्फेट, पोटेशियम सिलिकेट, बोरेट्स, लिग्नोसल्फोनेट्स आणि जेलींग एजंट्सच्या मिश्रणाने तयार केली जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अमोनियम सल्फेट असतो, ज्यामुळे ही पावडरला नैसर्गिकदृष्ट्या अतिशय धोकादायक मानली जाते.
पावडरचा रंग पिंक का आहे?
या पावडरचा रंग गुलाबीच का आहे, यावर देखील प्रश्न उपस्थित होतात. या रासायनिक पदार्थात रंगाचा समावेश खास म्हणून केला जातो. त्यामुळे जिथे जिथे हे पाउडर पडते, तिथे अग्निशमन कर्मचाऱ्यांना ते लगेच ओळखता येतं. यामुळे ते त्या ठिकाणी तत्काळ पोहोचून आग विझवू शकतात. पिंक पावडर आगीला ऑक्सिजन मिळू देत नाही, त्यामुळे आग मंदावते आणि अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवण्यात सुलभता येते.