Pakistan Blast 
देश-विदेश

Pakistan Blast : पाकिस्तानच्या क्वेटामध्ये भीषण स्फोट; 10 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी

स्फोटानंतर गोळीबार सुरू झाला

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • पाकिस्तानच्या क्वेटामध्ये भीषण स्फोट

  • 10 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी

  • स्फोटानंतर गोळीबार सुरू झाला

( Pakistan Blast ) पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा शहरात मोठा स्फोट झाला असून यात किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 32 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट पूर्व क्वेटातील फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ घडला. स्फोटानंतर तात्काळ गोळीबार सुरू झाला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की मॉडेल टाऊनसह आसपासच्या भागातील घरांच्या आणि इमारतींच्या काचा फुटल्या.

स्फोटानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना जवळच्या रुग्णालयांत हलवण्यात आले असून सिव्हिल हॉस्पिटल क्वेटा, बीएमसी हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टर, नर्सेस आणि सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून सर्वांना तातडीने ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे आणि कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळावरून धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसत असून स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सांगितले की स्फोटाची तीव्रता खूप जास्त होती आणि तो परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

क्वेटा हा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी असून येथे दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे वारंवार समोर येत असते.सध्या पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा