देश-विदेश

Indian Railway : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण; महाराष्ट्र सरकारची मान्यता

कोकण रेल्वेच्या विलीनीकरणामुळे रेल्वे विकासाला चालना

Published by : Shamal Sawant

देशातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे मार्गांपैकी एकअसलेल्या कोकण रेल्वेमध्ये (Konkan Railway)आता महत्वाचा बदल घडणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (Konkan Railway Corporation Limited ) भारतीय रेल्वेत (Indian Railways) विलीनीकरण होणार आहे. महाराष्ट्र सरकारने एप्रिल 2025 मध्ये या विलीनीकरणाला मान्यता दिल्यानंतर आता हे पाऊल महाराष्ट्र सरकारने उचलले आहे.

कोकण रेल्वे ची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली. कोकण रेल्वे ची लाईन रोहा पासुन सुरु होऊन गोआ कर्नाटक आणि केरळ भागापर्यंत जाते. पश्चिम घाटातील खडकांमधुन विविध भोगद्यांमधून अविरत पणे चालणारी आपली कोकण रेल्वे आता भारतीय रेल्वेमध्ये विलीन होणार आहे.याआधी गोवा कर्नाटक , केरळ या राज्यांनी आधीच या प्रस्तावाला मान्यता दिली होती. आता महाराष्ट्र सरकारने ही या प्रस्तावाला मान्यता दिल्यावर आता विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विलीनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तेच राहील जेणेकरून कोकणचे प्रादेशिक आणि ऐतिहासिक महत्व टिकुन राहील आणि कोकण रेल्वेच्या सुरुवातीच्या 394 कोटी रुपये गुंतवणुकीची परतफेड करावी या दोन अटी केंद्र सरकारने मान्य केल्या नंतर महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना पत्र पाठवुन महाराष्ट्र सरकारच्या वतीने या विलीनीकरणास मान्यता दिली.

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वे मध्ये विलीनीकरण झाल्यामुळे रेल्वेमधील गुंतवणुकीला ही मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार असुन याद्वारे अधिकाधिक कोकण रेल्वे चा ही विकास साधता येणार आहे. या विलीनीकरणामुळे रेल्वे मार्गांचे दुहेरी तिहेरी चौपदरीकरण, लोको शेड , फलाटांवरील शेड, अश्या पायाभुत सुविधांचा लवकरात लवकर विकास तसेच भारतीय रेल्वे प्रमाणे केंद्राकडून कोकण रेल्वे ला ही बजेटरी मदत ही यामुळे मिळणे शक्य होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी