(Mexico) मेक्सिकोतील इरापुआटो शहरात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा एका धार्मिक कार्यक्रमात काही अज्ञात व्यक्तींनी हा गोळीबार केला. या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू, तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. तसेच आणि जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला असून या घटनेची चौकशी सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.