(Mock Drill ) आज गुरुवारी संध्याकाळी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात, राजस्थान, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर तसेच चंदीगड या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणांवर गेल्या चार दिवसांच्या संघर्षादरम्यान सीमेपलीकडून जोरदार हल्ला झाला होता.
ऑपरेशन शील्ड अंतर्गत हे मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले होते. आज 5 वाजल्यापासून गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि चंदीगडसह केंद्रशासित प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार होते. मात्र आता ते पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याविषयी सर्व नागरी संरक्षण नियंत्रकांना आणि संबंधित विभागांना सूचना जारी करण्यास सांगण्यात आली असून सरकारी आदेशात सांगण्यात आले की, संबंधित अधिकारी आणि भागधारकांना कळवावे की ऑपरेशन शील्ड नागरी संरक्षण सराव पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. पुढील तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.