थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(White House Shooting) अमेरिकेतील 'व्हाईट हाऊस' जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत असून त्यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील ‘व्हाईट हाऊस’ जवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर काही वेळातच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
या घटनेनंतर अमेरिकेत मोठी खळबळ उडाली असून या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'खूप मोठी किंमत मोजावी लागेल’, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर इशारा दिला आहे.
Summery
अमेरिकेतील 'व्हाईट हाऊस' जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार
‘खूप मोठी किंमत मोजावी लागेल’
डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा