२६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या एनआयए कोठडीत आणखी 12 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यातच आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एनआयएने न्यायालयात एक महत्वाची माहिती दिली आहे.
हाफिज सईद आणि त्याची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा अजूनही भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने दिल्लीतील एका न्यायालयाला दिल्याची माहिती मिळत आहे.
हाफिज सईद हा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी असून त्याची संघटना ही भारतात दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. त्यामुळे लष्कर-ए-तैयबाच्या कार्यवाहीची माहिती उघड करण्यासाठी तहव्वुर राणाची कोठडी आवश्यक आहे. ही सर्व माहिती मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याच्या कोठडीवरील सुनावणीदरम्यान देण्यात आली आहे.