Kulgam Encounter 
देश-विदेश

Kulgam Encounter : 9 दिवसांपासून अखलमध्ये चकमक सुरू; 2 जवान शहीद, एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरात सुरू असलेली दहशतवादविरोधी मोहीम आज नवव्या दिवशी सुद्धा सुरूच आहे.

Published by : Team Lokshahi

( Kulgam encounter) जम्मू काश्मीर येथील कुलगाम जिल्ह्यातील अखल परिसरात सुरू असलेली दहशतवादविरोधी मोहीम आज नवव्या दिवशी सुद्धा सुरूच आहे. जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे भारतीय लष्कराची दहशतवाद्यांसोबत भीषण चकमक सुरु असून या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत, दोन सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 1 दहशतवादी ठार मारण्यात आला आहे.1 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या कारवाईची सुरुवात विशेष गुप्त माहितीच्या आधारे झाली. घनदाट जंगल आणि नैसर्गिक गुहेसारख्या जागांचा फायदा घेत काही दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बाकीच्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि पॅरा कमांडोंची मदत घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीर पोलिस प्रमुख नलिन प्रभात आणि उत्तरी लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे दोघेही संपूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. सुरक्षा दलांनी परिसराभोवती मजबूत घेराव तयार केला असून अद्याप सुद्धा ही मोहीम सुरूच आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी…..

Raksha Bandhan : वलसाडमधील अनोखं रक्षाबंधन; बहीण सोडून गेली, पण तिच्या हाताने बांधली राखी

Weather News : सोमवारपासून जोरदार पावसाचा इशारा, 11 राज्यांना रेड अलर्ट; महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी

Ravichandran Ashwin : अश्विन सोडणार CSK? Youtube शोमध्ये संजू सॅमसनसमोरच दिलं खरं उत्तर