देश-विदेश

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी 'Operation Sindoor' नाव का दिलं?

भारताने या ऑपरेशनचे नाव 'सिंदूर' असे ठेवले. भारताच्या या उचलेल्या धाडसी पावलाने प्रत्येक भारतीयाचा उर भरून आला.

Published by : Shamal Sawant

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी 26 निष्पाप जीवांचा बळी घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आर्थिक, डिजिटल, दळणवळण या सगळ्यांच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली. अशातच आता भारताने या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने हवाई हल्ला (Air Strike) करत बदला घेतला आहे. भारताने या ऑपरेशनचे नाव 'सिंदूर' असे ठेवले. भारताच्या या उचलेल्या धाडसी पावलाने प्रत्येक भारतीयाचा उर भरून आला.

जशाच तसे :

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी बैसरनमधील पर्यटकांना लक्ष्य केले, परंतु त्यांनी कोणत्याही महिलेला लक्ष्य न करता विवाहित महिलांच्या पतींना मारले. आता भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरच्या स्वरूपात या क्रूरतेला प्रत्युत्तर दिले. हे नाव निवडणे हे साधे लष्करी कोड नव्हते तर दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी होते. ज्या सिंदूरला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते त्याच सिंदूरच्या नावाखाली भारताने आपली लष्करी कारवाई केली.

तिच्या कुंकवाचे उत्तर :

या कारवाईत भारताने पूर्णपणे संयमी आणि संतुलित लष्करी रणनीती स्वीकारली. ज्या ठिकाणाहून भारतावर हल्ला करण्याची योजना आखली गेली होती तेच तळ उद्ध्वस्त करणे हे लक्ष्य होते. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही तर ती एका सांस्कृतिक आणि नैतिक विजयाची सुरुवात आहे. दहशतवाद्यांनी सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला. त्या सिंदूरला उत्तर म्हणून भारताने त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. हे भारताच्या ताकदीचे प्रतीक आहे जे आता प्रत्येक हल्ल्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यास सज्ज आहे. भारताने हे देखील सिद्ध केले आहे की जेव्हा कुटुंब, संस्कृती आणि ओळखीवर हल्ला होतो तेव्हा ते केवळ प्रतिक्रिया देत नाही तर सूड उगवते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार