जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राइक करुन दहशतवादी तळांचा खात्मा केला आहे. यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये दहशतवादी मसुद अझहरच्या 14 कुटुंब सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे.
कुटुंबियांचा मृत्यू झाल्यानंतर मसूद अझहरने भाष्य केले आहे. तो म्हणाला की, "मीही मेलो असतो तर बरं झालं असतं". त्यामुळे आता अझहरची ही प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहेत.