देश-विदेश

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल भारतीय सेनेने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

या भ्याड हल्ल्याशी पाकिस्तानचा सहभाग असल्याचेदेखील उघड झाले होते.

Published by : Shamal Sawant

जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 भारतीय नागरिकांची हत्या केली. यामध्ये कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली होती. दरम्यान या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतववाद्यांची ओळखदेखील पटली. या भ्याड हल्ल्याशी पाकिस्तानचा सहभाग असल्याचेदेखील उघड झाले होते.

याला आता भारतीय सरकारने उत्तर दिले आहे. 7 मे रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास भारतीय वायु दलाने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आतमध्ये घुसून दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली आहेत. या मोहिमेला भारताने 'Opreation Sindoor'असे नाव दिले गेले. या नावाने सर्वच भारतीयांच्या काळजाला हात घातला गेला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली गेली. यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये कमांडर हफिज अब्दुल मालिक आणि मुदस्सीर यांचा खात्मा झाला आहे.

हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. विक्रम मिसरी, सेना दलाच्या सोफिया कुरेशी आणि वायु दलाच्या व्योमिका सिंग हे अधिकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी 6 ते 7 मे दरम्यान झालेल्या मोहिमेबद्दल माहिती दिली. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 9 तळं उद्ध्वस्त केले गेले. या तळांमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र, हँडलरदेखील होते. हे तळ उद्ध्वस्त करणे हा भारताचा महत्त्वाचा उद्देश होता.

यावेळी भारतीय सेना अधिकारी सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, "पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी 22 एप्रिल रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. या कारवाईत, 9 दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली.

त्याचप्रमाणे, मार्च 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार सैनिक शहीद झाले. त्याला पाकिस्तानमधील एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले. तसेच मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?