भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. 'ऑपरेशन सिंदूर' मिशन भारताने आखले होते. भारताने हवाई हल्ला करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. यानंतर आता अमेरिकेकडूनही शेजारी देशाला इशारा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचा दावा व्हाईट हाऊसच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे.
पाकिस्तानला ठणकावलं :
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्ताना ठणकावले आहे. ते म्हणाले की, "पाकीस्तानने एअर स्ट्राइकला उत्तर देण्याचा विचारदेखील करु नये", तसेच, भारताबाबत, रुबियो म्हणाले की, "भारताला दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. आता भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने कोणताही हल्ला करु नये".
परराष्ट्रमंत्र्यांचे ट्वीट :
तसेच या हल्ल्यानंतर मार्को रुबियो यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, मी भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आजच्या आधी केलेल्या टिप्पण्यांवरून आशा व्यक्त होते की हे लवकरच संपेल आणि शांततापूर्ण तोडग्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्वाला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.