देश-विदेश

Operation Sindoor : 100 किलोमीटर आत घुसून कारवाई ; Operation Sindoor मध्ये आतापर्यंत काय काय घडलं ?

भारताने मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली.

Published by : Shamal Sawant

भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला गेला. भारताने मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. यामध्ये दहशतवाद्यांचे मुख्य 9 तळ उद्ध्वस्त केली. या ऑपरेशनला 'सिंदूर' असे नाव देण्यात आले. या घटणेमुळे पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. या हल्ल्यामध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासून लक्ष ठेवले होते.

पण 'ऑपरेशन सिंदूर' कसे पार पडले ? याबद्दलची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यास सुरुवात केली. मुजफ्फराबाद शहराच्या जवळपास स्फोटाचे आवाज ऐकू आले. या स्फोटानंतर शहरातील लाइट गेली. त्यानंतर लगेचच पाकिस्तान सैन्याचा जबाब समोर आला. भारताच्या या कारवाईचा बदला घेतला जाणार असे पाकिस्तानने म्हंटलं आहे.

त्यानंतर अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी एनएसए आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांनी भारताने केलेल्या हल्ल्याबद्दल भाष्य केले. हल्ल्यानंतर पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली. पाकिस्तानने त्यांचे सर्व एअरस्पेस बंद केले आहेत. हल्ला झालेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आणि पूंछ-राजौरी सेक्टरमधील भिंबर गली भागात तोफांचा मारा केला.

100 किलोमीटर आत घुसून कारवाई :

बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे. मुरीदके सांबाच्या समोरील सीमेपासून 30 किमी आत लष्कर-ए-तैयबा कॅम्प. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी येथूनच आले होते. गुलपूर हे पूंछ-राजौरीपासून नियंत्रण रेषेच्या आत 35 किमी अंतरावर आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ येथे झालेला हल्ला आणि जून 2024 मध्ये प्रवासी बसवरील हल्ला यांचे मूळ येथेच आहे. पीओजेकेच्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किमी आत लष्कर कॅम्प सवाई आहे. बिलाल कॅम्प हे जैश-ए-मोहम्मदचे लाँचपॅड आहे. राजौरीच्या समोर नियंत्रण रेषेच्या आत 15 किमी अंतरावर लष्कर कोटली कॅम्प. लष्कराचे बॉम्बस्फोट प्रशिक्षण केंद्र, 50 दहशतवाद्यांची क्षमता आहे. बरनाला कॅम्प राजौरी समोरील एलओसीच्या आत 10 किमी अंतरावर सांबा-कठुआच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत 8 किमी अंतरावर, सरजल कॅम्प जैश कॅम्प आहे. तसेच सियालकोटजवळील आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत आहे मेहमूना कॅम्प, हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा