जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 26 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. लष्करी गणवेशात असल्याने पर्यटकांना दहशतवादी असल्याचा अंदाज आला नाही. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांचा सौदी अरब दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरब दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून हल्ल्याचा निषेध केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहेत.