देश-विदेश

India Vs Pakistan War : पाक काही सुधरेना! सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने 26 ठिकाणी केले ड्रोन हल्ले

भारत-पाक संघर्ष: पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी 26 ठिकाणी ड्रोन हल्ले केले, भारतीय सैन्याने प्रतिहल्ला करत पाकिस्तानच्या हल्ल्याला रोखले.

Published by : Prachi Nate

पहलगाम हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. यावर पाकिस्तान शांत न बसता पाकिस्तानकडून देखील गुरुवारी 8 मे 2025 रात्री 9 वाजल्यापासून भारतावर हल्ले केले जात होते. या हल्ल्यात भारतीय सैन्य पाकिस्तानला रोखठोक प्रतिहल्ला करताना पाहायला मिळत आहे.

याचपार्श्वभूमीवर काल शुक्रवारी 9 मे 2025 रोजी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील 26 शहरांमध्ये ड्रोन हल्ले केले. पाकिस्तानचे हे हल्ले भारतीय संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला ते भूजपर्यंतच्या 26 ठिकाणी ड्रोन वापरून हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने अयशस्वी ठरवला. भारतीय सैन्याने काउंटर-ड्रोन सिस्टीमचा वापर करून सर्व हवाई धोक्यांचा मागोवा घेतला आणि त्यांना पाडले.

पाकिस्तानने हल्ला केलेल्या ठिकाणांमध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरातसह, बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज, कुआरबेट आणि लाखी नाला या ठिकाणांचा समावेश होता. यादरम्यान पाकिस्तानने फिरोजपूरमधील एका नागरी भागाला आपल्या निशाण्यावर ठेवले आणि सशस्त्र ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात तेथील एक स्थानिक कुटुंब या ड्रोन हल्ल्याच्या तावडीत सापडला. या कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एवढचं नाही तर भारताने सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. ज्यामुळे दोन्ही देशात आणखी तणाव वाढला आहे. पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की भारताने सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पाकिस्तानने याला भारताचे बेजबाबदार कृत्य म्हटले आहे. त्यानंतर पाकिस्तानने एअरबेस बंद केला आणि NOTAM (Notice to Airmen)जारी केला गेला आहे. याचपार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे सैनिक सतर्क आहेत.

भारताने बॅलेस्टिक मिसाइलद्वारे तीन एअरबेसना टार्गेट केलं. रात्री उशिरा भारताने पाकिस्तानात एकापाठोपाठ एक 6 बॅलेस्टिक मिसाईल्स डागले. यात रावळपिंडीमधील नूर खान एअरबेस, शोरकोटमध्ये रफ़ीकी एअर फोर्स तळ आणि मुरीद एअरफोर्स बेसला टार्गेट करण्यात आलं. भारताकडून अजून याची पुष्टी करण्यात आलेली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा