पाकिस्तानमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानंतर अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. मात्र आता पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. कराचीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच काही भागांमध्ये 12 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना दोन महिन्यांसाठचा अन्नसाठा करण्याचे निर्देश दिले आहेत. वृत्तानुसार, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी विधानसभेत सांगितले की 13 मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी अन्नसाठा साठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.