भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.
या ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताला धमक्या द्यायला सुरूवात केल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या भाषणात पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी भारताला थेट धमकी दिल्याची माहिती मिळत असून "भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत चुकवावी लागेल. आम्ही काल रात्री सिद्ध केलंय की, पाकिस्तानला जशास तसं उत्तर कसं द्यायचं, हे माहीत आहे. आम्ही आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. असे ते म्हणाले.