पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमधील हल्लेखोरांनी तेथील जनतेला अक्षरश: सळो की पळो करून सोडले आहे. बलोच लिबरेशन आर्मीने जाफरा एक्सप्रेसचे अपहरण केले. त्यानंतर ट्रेनमधील अनेक प्रवासी व जवानांना ओलिस ठेवले. तसेच काही जणांची हत्यादेखील करण्यात आली. दरम्यान आता यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बलोच सैनिकांनी शुक्रवारी पाकिस्तानमधील ओलिस ठेवलेल्या 214 जवानांना ठार केले आहे. याबद्दल बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "पाकिस्तानातील सैन्याला कैद्यांच्या आदलाबदलीसाठी 48 तासांचा वेळ देण्यात आला होता. मात्र शाहबाज सरकार आणि पाकिस्तान सरकारने कोणतंही उत्तर न दिल्याने 214 जवानांना ठार करण्यात आले आहे".
दरम्यान आता पाकिस्तान लष्कराने 33 हल्लेखोरांना ठार केल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे 300 पेक्षा अधिक प्रवाशांचे प्राण वाचवल्याचे पाकिस्तान सैन्याने सांगितले आहे. नेहमीप्रमाणे 11 मार्च रोजी जाफर एक्सप्रेस क्वेटाहून पेशावरला रवाना झाली होती.ट्रेनमध्ये 400 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते. बलोनच्या डोंगराळ भागातून ट्रेन जात असताना बलुच लिबरेशन आर्मीने ट्रेनवर हल्ला करुन तिचे अपहरण केले होते. यात 58 जणांचा मृत्यू झाला होता.