दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळाला. जवळपास 27 ते 28 वर्षानी दिल्लीत भाजप सत्तेत आला आहे. दिल्ली शपथविधी सोहळा कधी होणार याबाबत चर्चा सुरु असताना आता उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे.
दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार शपथविधी सोहळा पार पाडला जाणार आहे. हा समारंभ सकाळी 11 वाजता सुरू होईल. तसेच उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना दुपारी 12:35 वाजता नियुक्त मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला शपथ घेतील. याचपार्श्वभूमिवर एक महत्त्वाची बातमी समोर आली. दिल्लीत भाजपच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची करण्यात घोषणा आली आहे.
दिल्लीत मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड करण्यात आली असून, दिल्लीतील भाजपा कार्यालयातील बैठकी नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.पर्यवेक्षक रवीशंकर प्रसाद आणि ओपी धनगड यांनी मुख्यमंत्री पदाची घोषणा केली. दरम्यान दिल्लीतील भाजपा कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.