युक्रेनमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रशियाने भारतीय व्यवसायांना मुद्दाम लक्ष्य केले जात असल्याचा दावादेखील युक्रेनने केला आहे. याबद्दलची माहिती भारतीय दुतावासाने दिली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर दिली आहे.
युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसुमच्या गोदामावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. मॉस्कोकडून सातत्याने भारतीय व्यवसायांना लक्ष्य केले जात आहे. तसेच वृद्ध आणि लहान मुलांसाठी बनवण्यात येणाऱ्या औषधांना नष्ट करण्यात येत असल्याचे युक्रेनमधील भारतीय दुतावासाने म्हंटले आहे. या हल्ल्याबाबत अद्याप रशियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्याचप्रमाणे युक्रेनमधील ब्रिटनचे राजदूत मार्टिन हॅरिस यांनी हल्ल्याची माहिती आणि हा हल्ला क्षेपणास्त्राने नाहीत तर रशियन ड्रोनने केले असल्याचे सांगितले.
कंपनीच्या वेबसाइटनुसार, कुसुम हा एक औषध कंपन्यांचा एक बहुराष्ट्रीय गट आहे. यामध्ये युक्रेन, भारत, मोल्दोव्हा, कझाकस्तान, उझबेकिस्तान, फिलीपिन्स, म्यानमार, मेक्सिको आणि केनियामध्ये 2000 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कुसुमद्वारे चार आधुनिक उत्पादन सुविधा दिल्या जातात. त्यापैकी तीन सुविधा भारतात असून एक युक्रेनमध्ये आहे